शालेय विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव करून देण्यासाठी शिबिरे महत्त्वाची: न्यायाधीश एन. डी. रुद्रभटे

ज्ञानप्रबोधिनी : शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान होऊन या वयातच कायद्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी कायदे विषयक शालेय विद्यार्थ्यांना कायद्याची जाणीव करून देण्यासाठी शिबिरे महत्त्वाची: न्यायाधीश एन. डी. रुद्रभटे मार्गदर्शन शिबीर महत्वाचे आहे, असे उदगार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एन. डी. रुद्रभटे यांनी काढले.
गारगोटी हायस्कूल येथे विधी सेवा समिती गारगोटी, बार असोसिएशन गारगोटी व गारगोटी हायस्कूल अँड समर्थ ज्युनिअर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित कायदे विषयक मार्गदर्शन शिबीरप्रसंगी न्यायाधीश एन. डी. रुद्रभटे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
प्रारंभी दीप प्रज्वलन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश एन. डी. रुद्रभटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३’ या संदर्भात मार्गदर्शन केले.
जेष्ठ वकील ॲड.एस. डी. भोसले यांनी शालेय जीवनात कायद्याचे ज्ञान घेणे आवश्यक आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही शाळकरी मुले ट्रिपल सीट गाडी चालवतात. यातून होणारे अपघात व त्यामुळे पालकांना होणारा त्रास याबाबत माहिती दिली.
ॲड. व्ही. डी. म्हांगोरे यांनी ‘बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६’ या विषयावर मार्गदर्शन करताना बाल विवाहास कायद्याने बंदी असूनही बालविवाह केल्यास होणाऱ्या परिणामांची माहिती दिली.
ॲड. हर्षदा पोर्लेकर यांनी ‘नागरिकांची मूलभूत कर्तव्ये’ या विषयावर मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांस अधिकार दिले आहेत. त्याबरोबर ११ मूलभूत कर्तव्ये, जबाबदाऱ्या आहेत, त्या पार पाडणे आवश्यक आहे.
ॲड. अपुर्वा देसाई यांनी ‘पोक्सो ॲक्ट’ या विषयावर मार्गदर्शन करताना लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठीच पोक्सो ॲक्टची निर्मिती झाली असल्याचे सांगितले.
प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी बाल गुन्हेगारी वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त करुन शालेय वयातच कायद्याबाबत ज्ञान होणे आवश्यक असून यासाठी अशा शिबिरांची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी गारगोटी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.संग्रामसिंह कडव, ॲड. ए. व्ही. करवळ, ॲड. ए. बी. पोर्लेकर, सौ. एस. एस. कागवाडे यांच्यासह विधिज्ञ्, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी स्वागत युवराज शिगावकर यांनी प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी आभार व सूत्रसंचलन आर. पी. गव्हाणकर यांनी केले.





