आळंदीत निघाली चिमुकल्यांची “वारकरी दिंडी’

आळंदी – पंढरपूर आषाढी वारीनिमित्त राज्यभरात भक्तीमय वातावरण आहे. आषाढी वारीचा हा सोहळा मोठया उत्साहात साजरा केला जात आहे. 17 जुलै ला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्ताने आळंदीतील गुरुमाऊली इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बाल विद्यार्थ्यांनी माऊलीसह भावंडांचा वेष केला होता. यामध्ये आयुष जुनारे याने संत निवृत्तीनाथ महाराज, कैवल्य राम घुंडरे संत ज्ञानेश्वर महाराज, राम गाढवे संत सोपानकाका महाराज, आर्या सोनार हिने आदिशक्ती संत मुक्ताबाई, तर पृथ्वीराज घोडके
चांगदेव महाराज यांचा वेष घेतला. इतर बाल विद्यार्थी वारकरी वेषात हरीनामाचा गजर करत दिंडी काढण्यात आली. आषाढी वारीनिमित्त बाल विद्यार्थ्यांना संस्कृतीची, वारकरी संप्रदायाची आवड निर्माण व्हावी म्हणून वारकरी विद्यार्थी दिंडी समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, चांगदेव महाराज सर्व वेशभूषांमध्ये आकर्षक अशी वारकरी दिंडी संपन्न झाली. इंग्लिश मिडीयम स्कुलचे ज्ञानेश्वर घोडके, अजय घुंडरे यांसह आदी उपस्थित होते.





