Mumbai News : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.! मुंबईत १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बस प्रवास
Mumbai - BEST bus - school students या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासासाठी सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः लांबच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.

Mumbai – BEST bus – school students : मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) च्या ताज्या अर्थसंकल्पात इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘BEST’ बसने मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या गणवेशधारी विद्यार्थ्यांना आता शाळेत ये-जा करण्यासाठी ‘बेस्ट’ (Best) बसचा पूर्णपणे मोफत प्रवास करता येणार आहे. वाढत्या प्रवासखर्चामुळे पालकांवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे.
या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासासाठी सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहे. विशेषतः लांबच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.
विशेष बससेवेचीही तरतूद : Mumbai News
ज्या भागात नियमित बससेवा उपलब्ध नाही किंवा अपुरी आहे, त्या ठिकाणी पालिकेकडून विशेष बससेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम किंवा कमी वाहतुकीच्या भागांतील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्थसंकल्पात ८.७० कोटींची तरतूद :
या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महानगरपालिकेने अर्थसंकल्पात तब्बल ८ कोटी ७० लाख रुपये राखून ठेवले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये आणि शाळेत उपस्थिती वाढावी, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंद :
या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मोफत बस प्रवासामुळे केवळ आर्थिक बचतच होणार नाही, तर विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि नियोजनबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबईतील शिक्षणव्यवस्थेला बळ देणारा आणि सामाजिक दायित्व जपणारा हा निर्णय भविष्यात इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकतो.






