नगर, दि. 5 (प्रतिनिधी)- महापालिकेत भिंगार छावणी परिषद हस्तांतरित करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याने छावणी परिषदेची अवस्था दयनीय झाली आहे. विकास कामांसह कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी देखील निधी नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तब्बल पाच महिन्यांचे पगार रखडले आहेत. याबाबत दैनिक “प्रभात’ ने वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यानंतर आज छावणी परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचा पगार मुख्याधिकाऱ्यांनी केले आहेत. तसेच उर्वरित पगार देखील करण्याचे आश्वासन दिले आहे.
दैनिक “प्रभात’ याबाबत वाचा फोडल्यानंतर कर्मचाऱ्यांनी दैनिक “प्रभात’च्या प्रस्तृत प्रतिनिधीचे धन्यवाद मानले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे चार महिन्याचे पगार करण्यात आले आहे. त्यामुळे हे कर्मचारी खूष झाले असून त्यांनी दैनिक “प्रभात’मुळे पगार झाल्याचे स्पष्ट केले आहे.
छावणी परिषदेकडे विकास कामांसह कर्मचाऱ्यांच्या वेतनाला देखील निधी उपलब्ध होत नसल्याने कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 5 महिन्यांपासून झाले नाहीत. त्यामुळे आर्थिक कोंडीत हे कर्मचारी सापडले होते. या कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांउण्यात आल्या होत्या. याबाबत मुख्याधिकाऱ्यांचे मत देखील घेण्यात आले होते. विकास कामांसह पगारासाठीही निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांचे हात बांधले गेले होते. पगारासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर मुख्याधिकारी एक महिन्याचे पगार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नुकतेच या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार देण्यात आला आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना चार महिन्याचा पगार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.