BWF Malaysia Open 2024 : एकेरीत श्रीकांतचं आव्हान संपुष्टात, दुहेरीत मात्र अश्विनी-तनिषाची आगेकूच…

BWF Malaysia Open 2024 : मलेशिया ओपन 2024 मधील पुरुष एकेरीत भारताची मोहीम गुरुवारी किदाम्बी श्रीकांतच्या पराभवाने संपुष्टात आली. पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत 5व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव करणाऱ्या श्रीकांतला 38 मिनिटे चाललेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानावर असलेल्या चायनीज तैपेईच्या ‘अँगस एनजी का लाँग’कडून 21-13, 21-17 असा पराभव पत्करावा लागला. याच स्पर्धेत एचएस प्रणॉय आणि लक्ष्य सेन बुधवारी पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर स्पर्धेबाहेर झाले आहेत.
महिला दुहेरीत यश…
भारताला गुरुवारी महिला दुहेरीतही यश मिळाले. जागतिक क्रमवारीत 24व्या स्थानी असलेल्या अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो यांनी 16 व्या फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 9व्या स्थानी असलेल्या वाकाना नागहारा आणि मायू मात्सुमोटो यांचा 21-19, 13-21, 21-15 असा पराभव करत आगेकूच केली.
पुरूष दुहेरीत कमाल…
भारताची अव्वल पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी क्वालालंपूर येथे मलेशिया ओपन 2024 बॅडमिंटन स्पर्धेच्या 16 व्या फेरीत विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
BWF Malaysia Open 2024 : सात्विक-चिरागची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मलेशिया ओपनचे निकाल पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी खेळाडूंच्या पात्रता क्रमवारीत गणले जातील. बॅडमिंटनसाठी पात्रता विंडो गेल्या वर्षी 1 मे रोजी सुरू झाली आहे.





