Devendra Fadnavis : चर्चेला उधाण! काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी CM फडणवीस यांच्यासोबत केला ‘एकत्र’ प्रवास
Devendra Fadnavis : आता एक मोठी बातमी समोर आली असून, या बातमीमुळे पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे.

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांना फोडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. या घडामोडीनंतर शिंदेंकडून मोठा डाव टाकला जाऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे.
या संभाव्य राजकीय घडामोडीची चर्चा सुरू असतानाच जेष्ठ नेते शरद पवार यांनी विधानभवनात जात एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता एक मोठी बातमी समोर आली असून, या बातमीमुळे पुन्हा एकदा विविध चर्चांना उधाण आले आहे.
काँग्रेसच्या माजी मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र प्रवास केला आहे. या एकत्र प्रवासावरून तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मात्र, हा प्रवास माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला उपस्थित राहण्यासाठी केल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र मुंबई पुणे असा प्रवास केला आहे. या दोन्ही नेत्यांनी पुण्यात येत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. मात्र, दोन नेत्यांचा एकत्र प्रवासाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा : pune : वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी पाणीटंचाई
मुख्यमंत्री काय म्हणाले?
“अतिशय सुखाने ही वारी व्हावी हीच विठूरायाचरणी प्रार्थना आहे. मी जेव्हाही पांडुरंगाकडे जातो, तेव्हा मी एकच मागणे मागतो, की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखी ठेव. कारण सगळे शेतकरी वारकरी आहेत. मी देवाकडे येताना काही मागत नाही. न मागताही मिळतं. या वारीत येण्याची एक अनुभूती आहे. वारी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
हेच सगळ्यांना उत्तर : मुख्यमंत्री फडणवीस
तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांना महत्वाचे आवाहन केले. “तुम्ही सगळे आनंदाने जा आणि सुखरुप जा. वारकरी हे शेतकरी पण आहेत त्यामुळे त्यांचे चांगल होवू दे.” असे फडणवीस म्हणाले. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून मिसिंग लिंक येथे दरड कोसळण्याच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यावर काहीही अडचण न येता मी मिंसिग लिंकवरुन आलो हेच सगळ्यांना उत्तर आहे, असेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : Pimpri: सुविधा नाहीत, तर कर नाही…; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी





