Smartphone Offers: 8 हजारांच्या बजेटमध्ये घरी घेऊन जा 6000mAh बॅटरीसह येणारा पॉवरफुल फोन, पाहा फीचर्स

Infinix Smart 8 Plus Specifications : नवीन स्मार्टफोन खरेदी करताना आपण सर्वात आधी बॅटरीबद्दल जाणून घेतो. स्मार्टफोनचा वापर दिवसभर करत असल्याने त्यातील बॅटरी जास्त क्षमतेची असणे गरजेचे आहे. तुम्ही जर कमी किंमतीत 6000mAh बॅटरीसह येणारा स्मार्टफोन शोधत असाल तर आम्ही तुम्हाला असाच एक चांगला पर्याय सुचवणार आहोत. तुम्ही 6000 mAh बॅटरीसह येणाऱ्या या स्मार्टफोनला 8 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. या बजेटमध्ये तुम्हाला Infinix Smart 8 Plus स्मार्टफोन खरेदी करता येईल. इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Infinix Smart 8 Plus ची किंमत
Infinix Smart 8 Plus स्मार्टफोन 4GB+64GB आणि 4GB+128GB या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. या स्मार्टफोनची किंमत फक्त 7,799 रुपये आहे. या फोनला तुम्ही फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. यावर तुम्हाला ऑफर्सचा देखील लाभ मिळेल.
Infinix Smart 8 Plus चे स्पेसिफिकेशन्स
Infinix Smart 8 Plus मध्ये मीडियाटेक हीलियो जी36 प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबतच, PowerVR GE8320 जीपीयू मिळतो. स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन 720×1612 पिक्सल आहे.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात रियरला 50 मेगापिक्सलचा एआय लेन्ससह येणारा कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. यामध्ये 4 जीबी रॅमसह 64/128 जीबी स्टोरेज दिले जाते. तसेच, 18 वॉट चार्जिंग सपोर्टसह 6000 एमएएच बॅटरी मिळेल. कमी किंमतीत जास्त क्षमतेच्या बॅटरीसह येणारा फोन शोधत असाल तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. दैनंदिन कामासाठी हा स्मार्टफोन तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल.





