कमी किंमतीत 5G स्मार्टफोन; Redmi A4 5G स्मार्टफोनवर मोठी सवलत; पाहा ऑफर

Redmi A4 5G Offer | जर तुम्ही बजेटमध्ये उत्तम 5G स्मार्टफोनच्या शोधात असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ई-कॉमर्स साइट Amazon वर Redmi A4 5G स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. 5G सपोर्ट, 50MP कॅमेरा आणि Snapdragon प्रोसेसरसह येणाऱ्या या फोनला तुम्ही 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. Redmi A4 5G स्मार्टफोनवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
Redmi A4 5G मध्ये मिळतील दमदार फीचर्स
Redmi A4 5G हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 6.88 इंचाचा HD+ डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह शानदार व्हिज्युअल अनुभव देतो. याला 5160mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही आहे.
फोनमध्ये 50MP ड्युअल रिअर कॅमेरा आणि 5MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला IP52 रेटिंग मिळाले आहे. रेडमीचा हा फोन स्टारी ब्लॅक आणि स्पार्कल पर्पल या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi A4 5G वर मिळेल बंपर ऑफर
Amazon वर सध्या चालू असलेल्या डीलमध्ये Redmi A4 5G चे बेस व्हेरिएंट 8,499 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत 10,999 रुपये आहे. मात्र, 23 टक्के डिस्काउंटनंतर फोन फक्त 8499 रुपये किंमतीत खरेदी करता येईल.
याशिवाय, Amazon Pay बॅलन्सद्वारे पेमेंट केल्यास ग्राहकांना अतिरिक्त कॅशबॅकही मिळू शकतो. जुन्या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, जी फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. अशाप्रकारे, तुम्ही रेडमीचा हा फोन 8 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता.





