किंमत कमी अन् फीचर्स जबरदस्त, अवघ्या 15 हजारांच्या बजेटमध्ये येतोय ‘हा’ स्मार्टफोन: पाहा ऑफर

Infinix Note 40 5G Smartphone Offer | तुम्ही 15 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगल्या कॅमेऱ्यासह येणारा स्मार्टफोन शोधत असाल, तर Infinix Note 40 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. 8GB रॅम आणि 256GB इंटर्नल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत फ्लिपकार्टवर 15,999 रुपये आहे.
मात्र, या फोनला तुम्ही ऑफरसह खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. या फोनवर 1 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल.फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या कार्डने पेमेंट करणाऱ्या युजर्सना 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देखील मिळेल.
याव्यतिरिक्त, एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 9,900 रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकतो. मात्र, एक्सचेंज ऑफर तुमच्या जुन्या फोनवर अवलंबून आहे. सर्व ऑफर्सचा फायदा मिळाल्यास फोनची किंमत अजूनच कमी होईल.
Infinix Note 40 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Infinix Note 40 5G मध्ये 6.78 इंच फुल HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz चा रिफ्रेश रेट सपोर्ट करतो आणि याची पीक ब्राईटनेस 1300 निट्स आहे. फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. फोन डायमेन्सिटी 7020 प्रोसेसर येतो.
फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये LED फ्लॅशसह 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देत आहे. हा कॅमेरा OIS फीचरसोबत येतो. यासोबतच फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी कंपनीने यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 15W वायरलेस मॅगचार्ज सपोर्ट देखील मिळतो. बायोमेट्रिक सुरक्षिततेसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. फोन अँड्रॉइड 14 वर आधारित XOS 14 वर काम करतो. यासोबतच फोनमध्ये IR सेन्सर देखील उपलब्ध आहे.





