5600mAh बॅटरी, 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह ‘या’ कंपनीचा दमदार स्मार्टफोन लाँच, किंमत-फीचर्स पाहा

Vivo V50e Details | Vivo ने आपला नवा स्मार्टफोन Vivo V50e भारतीय बाजारात सादर केला आहे. स्टायलिश डिझाईन आणि पॉवरफुल फीचर्ससह सुसज्ज असलेला हा फोन अल्ट्रा स्लिम क्वाड कर्व्हड AMOLED डिस्प्ले, 50MP सेल्फी कॅमेरा, आणि 5600mAh बॅटरीसह येतो.
स्मार्टफोनमध्ये विविध AI फंक्शन्स, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. Vivo V50e च्या किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
Vivo V50e ची किंमत
Vivo V50e चे 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल₹28,999 रुपये तर 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल 30,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन 17 एप्रिलपासून Amazon, Flipkart, Vivo India Online Store आणि ऑफलाइन स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनच्या खरेदीवर आकर्षक ऑफर्सचाही फायदा मिळेल.
Vivo V50e चे स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये 6.77 इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट करतो. यात सुरक्षेसाठी डायमंड शील्ड ग्लासची दिली आहे.
Vivo V50e मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर दिला असून याला Mali-G615 GPU सह जोडण्यात आले आहे. डिव्हाइस Android 15 आधारित FuntouchOS 15 वर चालतो. यात 5600mAh बॅटरी दिली असून, ती 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर फोनमध्ये मागील बाजूस 50MP Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा OIS सह, आणि 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फीसाठी f/2.0 अपर्चरसह 50MP फ्रंट कॅमेरा दिला असून तो आय ऑटोफोकससह येतो.
Vivo V50e मध्ये 5G, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, USB Type-C यांसारखे आधुनिक कनेक्टिव्हिटी पर्याय दिले आहेत. यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टिरीओ स्पीकर्स, USB-C ऑडिओसह प्रीमियम ऑडिओ अनुभव मिळेल.





