फ्लॅगशिप फीचर्स बजेट किमतीत! Motorola Edge 60 Stylus भारतात लाँच, पाहा डिटेल्स

Motorola Edge 60 Stylus | मोटोरोला कंपनीने भारतात आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus लाँच केला आहे. स्लीक डिझाईनसह येणाऱ्या या हँडसेटमध्ये अनेक फ्लॅगशिप फीचर्स देण्यात आले असून, तो बजेट फ्रेंडली किंमतीत उपलब्ध आहे. Motorola Edge 60 Stylus मध्ये Qualcomm Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असून तो Android 15 आधारित नवीन Hello UI सिस्टीमवर चालतो.
स्टायलससह क्रिएटिव्हिटीला बुस्ट
या फोनमध्ये कंपनीने स्टायलसची संकल्पना पुन्हा आणली आहे. यूजर्स चित्र काढणे, नोट्स घेणे, Adobe Doc Scan यांसारख्या विविध क्रिएटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह टूल्सचा सहज वापर करू शकतात.
Motorola Edge 60 Stylus ची भारतातील किंमत
Motorola Edge 60 Stylus ची भारतातील किंमत 22,999 रुपये आहे. मात्र लाँच ऑफर अंतर्गत तो 21,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या डिव्हाईसमध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. Axis Bank आणि IDFC Bank च्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास अतिरिक्त 1,000 रुपयांची सूट मिळू शकते.
वाजता हा स्मार्टफोन Flipkart आणि Motorola India च्या वेबसाइटवर 23 एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे. स्मार्टफोन Pantone Gibraltar Sea आणि Pantone Surf the Web रंगात येतो.
Motorola Edge 60 Stylus चे वैशिष्ट्ये
- डिस्प्ले: 6.67-इंच 1.5K (1220×2712 पिक्सेल) pOLED, 120Hz रिफ्रेश रेट, 300Hz टच सॅम्पलिंग, 3000 nits ब्राइटनेस
- प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7s Gen 2
- रॅम/स्टोरेज: 8GB LPDDR4X RAM, 256GB UFS2.2 स्टोरेज (1TB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट)
- ऑपरेटिंग सिस्टम: Android 15 आधारित Hello UI, 2 वर्षे ओएस अपडेट, 3 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स
- कॅमेरा (रिअर): 50MP Sony LYTIA 700C मुख्य सेन्सर + 13MP अल्ट्रावाइड + 3-in-1 लाइट सेन्सर
- सेल्फी कॅमेरा: 32MP फ्रंट कॅमेरा
- ऑडिओ: ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स, Dolby Atmos सपोर्ट
- बॅटरी: 5000mAh, 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग
- सुरक्षा: इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
- कनेक्टिव्हिटी: 5G, 4G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, Galileo, NFC, USB Type-C





