Sunetra Pawar : “…पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील”; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar : तसेच, दादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालत प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे.

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. मात्र, पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन असल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीत सहभाग घेतला. परिणामी शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन स्वतंत्र गटांकडून वर्धापन दिन साजरा केला जात होता.
मात्र, यावर्षी जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने राज्यभर शोककळा पसरली होती. पवार कुटुंबासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही हा मोठा धक्का होता.
हेही वाचा : Satara: ‘श्याम बेनेगल’ पुस्तकाचा विविध भाषांत अनुवाद करावा; भारत सासणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७व्या वर्धापन दिनानिमित्त दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
तसेच, दादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालत प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केले आहे.
सुनेत्रा पवारांची पोस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे.
पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत,… pic.twitter.com/znyhzOGB4K
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) June 10, 2026
सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया.
हेही वाचा : Pune District : भीमाशंकरचे दर्शन कसे होणार?






