श्रीरामपूर, (शहर प्रतिनिधी)- तालुक्यातील दत्तनगर येथे फुले-शाहू- आंबेडकरनगर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्तनगर येथे पाठाच्या कडेला फुले-आंबेडकर नगर येथे सकाळी दहा वाजता बुद्ध जयंती साजरी करण्यात आली.
गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस सरपंच सारिका कुंकूलोळ, माजी सरपंच पी.एस. निकम, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, माजी सरपंच सुनील शिरसाठ, रवी अण्णा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मगर, प्रेमचंद कुंकूलोळ, सचिन ब्राह्मणे, रामदास रेने, सचिन राठोड, अनिल माघाडे, आनंद पठारे, हिरामण जाधव या सर्वांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण केले. यावेळी मनीषा हुसळे यांनी बुद्धवंदना घेतली. बाल शाहीर ओवी काळे यांनी बुद्ध पौर्णिमानिमित्त बुद्ध गीत गायले. यावेळी यश मगर, निखिल दुशिंग, नीलेश हुसळे, दिलीप कोळगे, बबलू सय्यद, आदिनाथ पठारे, प्रसाद काळे, वैशाली उसळे, अंजली जावळे, सुनिता रेने, अलका पठारे, सीमा कोळगे, सुनीता येणे, सुलताना सय्यद, सीताबाई साळवे, नंदा रेने, जुबेदा सय्यदसह अनेक महिला उपस्थित होत्या.