Ravi Rana Vs Yashomati Thakur | काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्यामधील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. दिवाळीनिमित्त आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी काढल्यामुळे यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘भैया-भाभीनं अवकातीत राहायचं’, अशा कडक शब्दांत यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. “भैया अन् भाभी अवकातीत राहायचं. मी पहिल्यांदा पराभूत झाली नाही. मी पराभूत झाली, किंवा जिंकली, मला काही फरक पडत नाही. मी पक्ष बदलत नाही. सरड्यासारखे रंग बदलत नाही. तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढे तुम्हाला सांगते. पुन्हा कधी अशी भानगड केली. तुम्हाला असे उत्तर देईल की, तुम्ही याद राखाल,” असा इशारा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला दिला. “मागच्या 10 वर्षांत काही विचित्र लोक राजकारणामध्ये आले आहेत आणि त्यांनी अमरावतीचे नाव खराब केलं आहे. एकदम हलकटपणाची वागणूक ते देतात, मलाही या दिवाळीत त्याचा अनुभव आला. हे चित्र-विचित्र लोक आहे. नवरा कुठे? बायको कुठे? कधी सत्तेमध्ये? कधी आमच्या सपोर्टने, कधी भाजपच्या सपोर्टने राजकारण करत असतात,” असं टोला ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे. Ravi Rana Vs Yashomati Thakur | ‘हरामखोरानो! असा आमचा अपमान खपवून घेणार नाही’ पुढे त्या म्हणाल्या, “हलकटासारखं माझ्या घरी किराणा पाठवला. शाळांमध्ये जे काही तेल वाटलं जातं, तेच या किराणाच्या पिशवीमध्ये आहे. परत जर असं केलं, तर चांगलं उत्तर मिळेल. माझ्या वडिलांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे करत नाही. तुम्ही जर, असे चिल्लर धंदे करत असाल, तर त्याचे उत्तर आम्हाला देता येतं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे, हरामखोरानो! असा आमचा अपमान खपवून घेणार नाही.” Ravi Rana Vs Yashomati Thakur | “शेतकऱ्यांना काय मदत करायची ती करा. त्यांना मदतीचे पैसे देता येईना आणि अशा इथं भानगडी करता. हे चिल्लर धंदे तत्काळ बंद झाले पाहिजे. जनतेच्या भावनांचा अपमान करून राजकारण करणाऱ्यांना अमरावतीकर कधीच माफ करणार नाहीत. राणा दाम्पत्याने आपली राजकीय नाटकबाजी थांबवावी, अन्यथा लोकचं त्यांना योग्य जागा दाखवतील,” असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे. Ravi Rana Vs Yashomati Thakur | हेही वाचा: parineeti chopra: ‘आता मी पूर्णपणे आई झाले आहे’, आई झाल्यानंतर परिणीती चोप्राची मजेशीर पोस्ट; चाहत्यांना हसू आवरले नाही