बीआर गवईंच्या निवृत्तीनंतर पुढील सरन्यायाधीश कोण असणार? केंद्र सरकारकडून प्रक्रियेला सुरुवात

Justice Suryakan | देशाचे विद्यमान सरन्यायाधीश बीआर गवई यांचा कार्यकाळ २३ नोव्हेंबर २०२५ संपणार आहे. त्यामुळे आता पुढील सरन्यायाधीश निवडण्याची प्रक्रिया केंद्र सरकारने सुरू केली आहे. नियमांनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये सरन्यायाधीशांनंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश हे हे पद भूषवत असतात. यासाठी सध्याचे सरन्यायाधीश नावाची शिफारस करत असतात. त्यानुसार, सरन्यायाधीश भूषण गवई हे सोमवारी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहेत
सीजेआय गवई सोमवारी (२७ ऑक्टोबर) केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची औपचारिक शिफारस करणार आहेत. ते सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना ते म्हणाले, “केंद्र सरकारकडून आपल्या कार्यालयाला पुढील सरन्यायाधीशांसाठी शिफारस मागवणारा संदेश मिळाला आहे. मी रविवार सायंकाळी दिल्लीला पोहोचेल आणि सोमवारी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करेन.”
कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत ?
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सूर्यकांत हे हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता, त्यांचे वडील शिक्षक होते. सूर्यकांत यांची मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यांनी 1981 मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी आणि 1984 मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली.
सूर्यकांत यांनी न्यायाधीश पदावर येण्यापूर्वी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून काम केले. त्यांनी केवळ ३८ व्यावर्षी ७ जुलै २००० रोजी ते हरियाणाचे अॅडव्होकेट जनरल म्हणून नियुक्त झाले. राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण अॅडव्होकेट जनरल म्हणून त्यांनी हा मान मिळवला. संवैधानिक, सेवा आणि नागरी कायद्यातील त्यांच्या कौशल्यासाठी ओळखले जाणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द चार दशकांहून अधिक काळाची आहे. Justice Suryakan |
तसेच ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही होते. सध्या ते सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत. आता 24 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारू शकतात. सधारण १५ महिने सरन्यायाधीश म्हणून काम करतील. त्यांचा कार्यकाळ ९ फेब्रुवारी २०२७ रोजी संपण्याची अपेक्षा आहे.
Justice Suryakan |
हेही वाचा :





