लंडन : ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्स बेसवरील दोन विमानांचे नुकसान केल्याचा दावा पॅलिस्टीनवाद्यांनी केला आहे. या दाव्याची पडताळणी पोलीस करत असून विमानांचे नुकसान करणाऱ्या संशयित खलिस्तानवाद्यांचा शोध देखील घेतला जातो आहे. ब्रिझ नॉर्टन येथील हवाई दलाच्या तळावरील दोन विमानांवर अग्निशामक उपकरणाच्या सहाय्याने लाल रंगाने काही आक्षेपार्ह मजकूर रंगवण्यात आला आणि क्रोबारच्या मदतीने या विमानांचे आणखी काही नुकसान केल्याचा दावा पॅलेस्टीन ॲक्शन या गटाने केला आहे. विमानांचे नुकसान करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जाऊ शकले नाही. हे कार्यकर्ते तेथून निघून जाण्यात यशस्वी झाले, असे पॅलेस्टाईन अॅक्शनने म्हटले आहे. इस्रायली सरकारचा जाहीर निषेध करूनही, ब्रिटन इस्रायलला मदत म्हणून लष्करी साधने पाठवत आहे, गाझावरून गुप्तचर विमाने उडवत आहे आणि अमेरिकन/इस्रायली लढाऊ विमानांना इंधन भरत आहे, अशी टीकाही या गटाने एका निवेदनात केली आहे. अप्रत्यक्षपणे गाझामधील नरसंहारात ब्रिटन सहभागी असल्याचा आरोपही या गटाने केला आहे. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेचीच्या वृत्ताला दुजोरा दिला असून रॉयल एअर फोर्सच्या मालमत्तेच्या नुकसानीचा तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे. लंडनच्या वायव्येस ७० मैल (११२ किलोमीटर) अंतरावर असलेल्या ब्राईझ नॉर्टन येथून विमाने नियमितपणे सायप्रसमधील आरएएफ अक्रोटिरी येथे जातात, हा तळ मध्य पूर्वेतील ऑपरेशन्ससाठी ब्रिटनचा मुख्य हवाई तळ आहे. जर इराणी हल्ल्यांना रोखण्यासाठी इस्रायलला मदत केली तर या प्रदेशातील अमेरिका, फ्रेंच आणि ब्रिटिश तळांवर हल्ला करण्याची धमकी इराणने दिली आहे.