इस्रायल खुली करणार रफाह सीमा; पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर जाऊ देणार

Updated On:
इस्रायल खुली करणार रफाह सीमा; पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर जाऊ देणार

जेरुसलेम : गाझामधील पॅलेस्टिनींना गाझामधून बाहेर जाण्यासाठी इस्रायल रफाह सीमा खुली करणार आहे. युद्धबंदीतल्या तरतूदींचा भाग म्हणून इस्रायलने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान हमासकडून परत मिळालेला मृतदेह हा उर्वरित ओलिसांपैकी कोणाचाही नसल्याचे फॉरेन्सिक तपासणीनंतर निष्पन्न झाल्याचेही इस्रायलने म्हटले आहे. तर दुसरीकडे उर्वरित दोन ओलिसांपैकी आणखी एकाचा मृतदेह परत देण्याची तयारी हमासने दाखवली आहे.

हा मृतदेह बुधवारी रेडक्रॉसच्या माध्यमातून परत दिला जाणार आहे. पण हा मृतदेह दोनपैकी नक्की कोणाचा आहे, हे हमासकडून स्पष्ट केले जाऊ शकलेले नाही. आता इस्रायलच्या ओलिसांपैकी इस्त्रायली नागरिक असलेल्या रान ग्विली आणि थाई नागरिक असलेल्या सुदथिसक रिंथलक या केवळ दोघांचे मृतदेह हमासकडून परत मिळणे बाकी आहे. ते परत मिळाल्यानंतर युद्धबंदीचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. पण मिळालेल्या मृतदेहाची फॉरेन्सिक तपासणी केल्यावर तो ओलिसांचाच असल्याचे निष्पन्न झाले, तरच पहिला टप्पा पूर्ण झाला असे मानले जाईल, असे इस्रायलने म्हटले आहे.

रफाह सीमा उघडली गेल्यानंतर वैद्यकीय उपचारांसाठी पॅलेस्टिनी बाहरे जाऊ शकणार आहेत. गाझा पट्ट्यामध्ये किमान १६,५०० आजारी आणि जखमी पॅलेस्टिनी असून त्यांना उपचारांसाठी गाझा पट्ट्यातून बाहेर काढले जाणे आवश्‍यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एका मृतदेहाची डीएनए तपासणी झाल्यावर तो ओलिसाचा नसल्याचे लक्षात आल्यामुळे इस्रायलने हा आग्रह धरला आहे.

रफाह सीमेतून पॅलेस्टिनींना केवळ बाहेरच जाता येऊ शकेल. या सीमेतून आत येता येणार नाही, असे इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पण जर या सीमेवरून दोन्ही बाजूंनी वाहतूक झाली, तरच दुसऱ्या बाजूकडून रफाह सीमा उघडली जाईल, असे इजिप्तने म्हटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Plane incident : फ्लायदुबईच्या विमानात थरार! भारतीय कॅप्टनवर को-पायलटचा चाकूने हल्ला; जखमी अवस्थेतही 180 हून अधिक प्रवाशांचे वाचवले प्राण

2026-09-30 21:39:55

Plane incident : फ्लायदुबईच्या विमानात थरार! भारतीय कॅप्टनवर को-पायलटचा चाकूने हल्ला; जखमी अवस्थेतही 180 हून अधिक प्रवाशांचे वाचवले प्राण

Masoud Pezeshkian : मोजतबा खामेनी जिवंत; इराणमध्ये अंतिम निर्णय त्यांचाच, राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांचा दावा

2026-09-12 22:38:28

Masoud Pezeshkian : मोजतबा खामेनी जिवंत; इराणमध्ये अंतिम निर्णय त्यांचाच, राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांचा दावा

BRICS Summit 2026 : ब्रिक्स घोषणेत अमेरिका, इस्रायलवर निशाणा; भारताची भूमिका बदलली का?

2026-09-12 19:19:55

BRICS Summit 2026 : ब्रिक्स घोषणेत अमेरिका, इस्रायलवर निशाणा; भारताची भूमिका बदलली का?

Israel Iran War: ‘इराणला मदत केली तर...’; मोदी-पेझेश्कियन भेटीपूर्वी अमेरिकेचा मोठा इशारा

2026-09-03 12:54:38

Israel Iran War: ‘इराणला मदत केली तर...’; मोदी-पेझेश्कियन भेटीपूर्वी अमेरिकेचा मोठा इशारा

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचे मुस्लिम देशांना पत्र केले 'हे' मोठे आवाहन

2026-08-30 20:16:51

Mojtaba Khamenei : मोजतबा खामेनी यांचे मुस्लिम देशांना पत्र केले 'हे' मोठे आवाहन