ब्रिजभूषण यांनी नार्को चाचणी करावी- मलिक

नवी दिल्ली -दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंचे धरणे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, 2016 रिओ ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (डब्लूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी नार्को टेस्ट करून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे.
सात कुस्तीपटूंनी आपल्यावर लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर डब्ल्यूएफआयचे प्रमुख ब्रिज भूषण यांना त्यांच्या
निर्दोष असल्याची खात्री असल्यास त्यांची खोटी शोधक नार्को चाचणी करावी. आम्हीही चौकशी करण्यास तयार आहोत. दोषी कोण आणि कोण नाही हे सत्य बाहेर येऊ द्या, असे साक्षीने यावेळी म्हटले आहे.
तसेच, जर ब्रिज भूषण अजूनही डब्ल्यूएफआयच्या कामकाजात सहभागी आहेत. त्यामुळे ते भविष्यात ते आम्हाला समर्थन देणऱ्या खेळाडूंना त्रास देतील. त्यामुळे ब्रिजभूषण डब्लूएफआयच्या निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारे सहभागी असल्यास आम्ही त्यांचा विरोध करू असे बजरंग पुनियाने यावेळी म्हटले आहे. कुस्तीपटूंनी गुरुवारी ब्रिजभूषण यांच्याविरोधातील तपासाच्या संथ प्रक्रियेच्या निषेधार्थ हातावर काळ्या पट्टी बांधण्याचा निर्णयही घेतला आहे.





