Ramayana : ‘रामायण’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, आकडा एकदा पाहाच…
रामायण: पार्ट वन हा दोन भागांच्या सिनेमॅटिक मालिकामधील पहिला भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओने यश यांच्या 'मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने केली आहे.

Ramayana – हिंदू पौराणिक महाकाव्यावर आधारित भव्य चित्रपट रामायण: पार्ट वनने बॉक्स ऑफिसवर दणकेबाज सुरुवात केली आहे. प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरात तब्बल १५५ कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती निर्मात्यांनी शुक्रवारी दिली.
नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटात भगवान श्री रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी, रावणाच्या भूमिकेत यश आणि लक्ष्मणाच्या भूमिकेत रवी दुबे मुख्य भूमिकेत आहेत.
निर्मात्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या चित्रपटाने भारतीय सिनेमाच्या इतिहासात प्री-दिवाळी (दिवाळीपूर्वीचा काळ) मधील आजवरची सर्वात मोठी ओपनिंग नोंदवली आहे. दिवाळीची तयारी आणि प्रवासाच्या गडबडीमुळे सहसा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी असते.
मात्र, हा काळ आव्हानात्मक असतानाही पहिल्याच दिवशी पहाटेच्या शोपासून प्रेक्षकांनी थिएटरमध्ये तुफान गर्दी केली. प्रेक्षकांच्या या अभूतपूर्व प्रतिसादामुळेच एवढी मोठी कमाई शक्य झाल्याचे निर्मात्यांनी म्हटले आहे.
रामायण: पार्ट वन हा दोन भागांच्या सिनेमॅटिक मालिकामधील पहिला भाग आहे. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओने यश यांच्या ‘मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सच्या सहकार्याने केली आहे.






