रक्ताने माखलेला चेहरा, तीक्ष्ण नजर अन्…; रश्मिकाचा भीतीदायक लूक समोर; चित्रपटाचे नाव काय? फोटो पाहा

Rashmika Mandanna New Movie : अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी तिच्या नवनवीन लूकचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असते. छावा चित्रपटानंर रश्मिका कुबेर या चित्रपटात दिसली आहे. नुकताच हा चित्रपट रिलीज झाला असून अभिनेता नागार्जून आणि धनुष्य यांच्यासह रश्मिका मुख्य भूमिकेत आहे.
अशातच रश्मिकाने तिच्या इन्स्टावर आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटातील तिच्या लूकचे फोटो तिने इन्स्टावर शेअर केले आहेत. रश्मिकाने शेअर केलेल्या फोटोत तिचा खरतनाक लूक पाहायला मिळत आहे. हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
रक्ताने माखलेला चेहरा तीक्ष्ण नजर आणि हातात शस्त्र. या रौद्रअवतारात रश्मिका दिसत आहे. या चित्रपटाचे नाव ‘मैसा’ असून रश्मिकाने फोटोसोबत हटके कॅप्शन देखील दिले आहे. ‘मी नेहमीच तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करते.’ असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
काहीतरी वेगळे, रोमांचक आणि हे त्यापैकीच एक आहे. एक अशी व्यक्तिरेखा ज्यामध्ये मी कधीही पाऊल ठेवले नाही, एका अशा जगात मी कधीही पाऊल ठेवलेले नाही आणि स्वतःची एक अशी बाजू ज्यामध्ये मी कधीही भेटले नाही. हे खूप धोकादायक आहे, म्हणूनच मी थोडी घाबरले आहे, पण खूप उत्साहित देखील आहे. अशी भावना चित्रपटाबाबत रश्मिकाने व्यक्त केली आहे.
रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हटले जाते. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण कलाकाराला नेहमी वाटत असते की आपण चाकोरीबाहेरचा अभिनय करु म्हणून. रश्मिकाचा मैसा हा चित्रपट त्यापैकीच एक असणार आहे. यामुळे मैसा चित्रपटाच्या रिलीजसाठी तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागलेली आहे.




