दीपिका पादुकोणला आणखी एक मोठा झटका! ‘स्पिरिट’नंतर कल्की 2 मधूनही पत्ता कट होणार?

Actress Deepika Padukone : दिग्दर्शक संदिप वांगा आणि अभिनेता प्रभास यांच्या बहुचर्चित स्पिरिट चित्रपटातून अभिनेत्री दीपिका पादुकोणला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. यानंतर बॅालीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या चित्रपटात दीपिकाच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरी हिला रेप्लेस करण्यात आले. अशातच आता दीपिकाच्या हातून कल्की २ हा चित्रपट जाण्याची शक्यता आहे. एका इस्टा पोस्टमुळळे कल्की २ चित्रपटातून देखील दीपिकाल काढले जावू शकते असे सांगितले जात आहे.
Bollywood.mobi नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर याबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दीपिका पादुकोण आई झाल्यानंतर तिच्या कामाचे काही तास कमी करण्याची मागणी होत आहे. यामुळे कल्की २ चे निर्माते तिची भूमिका कमी करण्याचा किंवा चित्रपटातून काढून टाकण्याचा विचार करत आहेत, असे या पोस्टमधून म्हटले आहे.
View this post on Instagram
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी दीपिका पादुकोणला तिच्या वाढत्या मागण्या आणि कामाचे तास कमी करण्याच्या मुद्यावर थेट ‘स्पिरिट’मधून काढून टाकले. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिकाच्या वाढत्या मागण्यांना कंटाळून दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते.
काही मीडिया रिपोर्टनुसार, नुकतीच दीपिका आई झाली आहे. तिला वैयक्तिक आयुष्य आणि तिच्या मुलीलाही वेळ द्यायचा आहे, अशी माहिती आहे. यामुळे आता कल्की २ हा चित्रपट देखील तिच्या हातून जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.
हेही वाचा: मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा फास आणखी घट्ट; मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी





