Actress Aneet Padda : “तुम्ही मला दिलेलं प्रेम माझ्यावर एक जबाबदारी”; सैयारा सिनेमातील अभिनेत्री भावूक झाली

Actress Aneet Padda : बॅाक्स अॅाफिसवर नवोदित अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा यांचा सैयारा सिनेमा हिट ठरला. १८ जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने या वर्षीच्या अनेक मोठ्या सिनेमांचं रेकॅार्ड मोडलं आहे. अजूनही या सिनेमाची बॅाक्स अॅाफिसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे. भारतच नाही तर परदेशातही सैयाराने प्रेक्षकांना वेडं लावलं आहे. या सिनेमाला एवढं मोठं घवघवीत यश मिळाल्यानंतर या सिनेमात काम केलेली अभिनेत्रीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री अनित पड्डा सैयारा सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादामुळे पुरती भारावून गेली आहे. तिने तिच्या सोशल सोशल मीडियावर अकांउंटवर सैयाराच्या सेटवरील काही फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
मला फक्त इतकंच सांगायचं आहे की, माझं माझ्या रसिक प्रेक्षकांवर खूप प्रेम आहे. आपल्यापैकी कोणीही एकमेकांना फारसं ओळखतही नसेल. पण, आपल्यामध्ये एक प्रेमळ नातं निर्माण झालं आहे. तुम्ही मला दिलेलं प्रेम माझ्यावर एक जबाबदारीआहे आणि त्याची परतफेड कशी करावी हे मला समजत नाही, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
सैयारा सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घातला आहे. अजूनही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. सिनेमाचा दबदबा कायम आहे. अवघ्या ४५ कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर नवा इतिहास रचत तब्बल ३०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
हेही वाचा : Swara Bhasker: पतीवर झालेल्या जातीवादी टिप्पणीवर संतापली स्वरा भास्कर; ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर





