Actress Kiara Advani : कियाराचा दमदार अॅक्शन अवतार! वॅार 2 चित्रपटातील लूक समोर, फोटो पाहा…

Actress Kiara Advani : वॅार 2 चित्रपटाच्या नवीन अपडेट्स नेहमी चित्रपटाच्या टीमकडून शेअर केल्या जात असतात. नुकताच या चित्रपटात भूमिका साकारणारी अभिनेत्री कियारा अडवाणीचा लूकचा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत कियाराचा दमदार अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. यामुळे अभिनेत्रीच्या नवा लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कियाराने तिच्या इन्स्टा अकाऊंवरून तिचे फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या आगामी ‘वॉर 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून ‘वॉर 2’ या चित्रपटाकडे पाहले जाते. लवकरच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील अनेक लक्षवेधक पोस्टर समोर येत आहेत. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर हे दोघे लीड रोलमध्ये असणार आहेत.
View this post on Instagram
गुरुवारी कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्रामवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये, अभिनेत्री अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या फोटोत अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेला असून हातात बंदूक घेऊन तिचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. यासोबतच अभिनेता हृतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर या दोघांच्या लूकचेही फोटो तिने शेअर केले आहे. १४ अॅागस्टला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
हेही वाचा : अजय देवगणचा ब्लॉकबस्टर ‘रेड २’ चित्रपट ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कुठे?





