Saina Nehwal : दुरावा मिटला! सायना नेहवालने पतीसोबतचा फोटो केला शेअर म्हणाली…
Saina Nehwal : क्रिडा क्षेत्रात घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचे पाहायाला मिळत आहे. यजुवेंद चहल, हार्दिक पांड्या, या स्टार क्रिकेटवरच्या घटस्फोट घेतल्याच्या बातम्याने देशभरात चर्चा झडू लागली होत्या. त्यांच्या चाहत्यांनाही याचा मोठा धक्का बसला आहे. अशातच ऑलिंपिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने देखील पती पारूपल्ली कश्यपसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला होता.
याबाबतीची माहिती तिने पोस्ट करून दिली होती. मात्र, सायना आणि तिच्या पतीचं पुन्हा पॅचअप झालं आहे. याबद्दल स्वतः सायनाने सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत घटस्फोटावर सायनाने भाष्य केलं होतं. पती पारुपल्ली कश्यपसोबत विभक्त होत असल्याचे तिने म्हटले होतं. ज्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता परत एकदा सायना नेहवाल हिने घटस्फोटाबाबत भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
घटस्फोट घेतल्याच्या घोषणेच्या १९ दिवसांनंतर सायना नेहवालने इन्स्टाग्रामवरून तिच्या पतीसोबचा फोटो शेअर करत कधीकधी एकमेकांमधील अंतर तुम्हाला लोकांचे महत्त्व सांगते…असं म्हटलं आहे. सायनाच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे आता दोघेही पुन्हा एकत्र येणार आहेत.
सायना नेहवाल आणि तिचा पती पारूपल्ली कश्यप यांनी एकत्र बॅडमिंटनचे धडे गिरवल आहेत. दोघेही एकत्र बॅडमिंटनचा सराव करायचे.
View this post on Instagram
या दरम्यान त्यांची मैत्री झाली आणि हळूहळू हे नाते प्रेमात परावर्तीत झाले. दोघांनीही १४ डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केलं. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याची पोस्ट सायनाने करत सर्वांनाच धक्का दिला. आता पुन्हा एकदा दोघे एकत्र येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
हेही वाचा : दिल्लीत ७ ऑगस्टला पुन्हा विरोधकांचा एल्गार ; फारुख अब्दुल्ला म्हणाले,”राहुल गांधींच्या विधानाचे सत्य ..”





