Actress Sanvika : प्राइम व्हिडीओवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या पंचायत या वेबसिरीजमध्ये रिंकीची भूमिका साकारलेली अभिनेत्री सान्विका हिला मोठी लोकप्रियता मिळाली. या सिरीजचा चौथा सिजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजमध्ये पुन्हा एकदा रिंकी हे पात्र पाहायला मिळणार आहे. या सिरीजचे जोरदार प्रमोशन सुरू असतानाच अभिनेत्री सान्विका हिने एक इन्स्टावर पोस्ट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अभिनेत्री सान्विकाने तिच्या संघर्षाच्या काळातील आठवणी या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. तिच्या मते ती जर इंडस्ट्रीमधील इनसायडर असती तर तिच्यासाठी गोष्टी आणखी सोप्या झाल्या असत्या. थोडक्यात या पोस्टमधून अभिनेत्रीने आऊसायडर असल्यावर किती स्ट्रगल करावे लागते याकडे इशारा केला आहे. सान्विका हिच्या मागे कोणतीही फिल्म बॅकग्राऊंड नाही. तिने पंचायत वेबसिरीजमधील रिंकीच्या भूमिकेतून लोकप्रियता मिळवली. पण तिला यासाठी खूप संघर्ष करावा लागला असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. या पोस्टमधून तिने आऊडसायडर नाही तर इनसाइडर बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सान्विका म्हणते, ‘कधीकधी मला वाटतं की जर मी एक इंडस्ट्रीत इनसायडर असते किंवा जर मी या पार्श्वभूमीतून आले असते तर गोष्टी आणखी सहज आणि सोप्या झाल्या असत्या. त्यामुळे आदर आणि समान वागणूक मिळणे यासारख्या मूलभूत गोष्टी सोप्या झाल्या असत्या. यासाठीचा संघर्ष कमी झाला असता असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. पंचायत या प्राइम व्हिडीओवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या वेबसिरीजमधून अभिनेत्री सान्विकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिने सिरीजमध्ये साकारलेली पिंकी ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. यामुळे आता चौथ्या सीजनमध्ये सचीव जी (जितेंद्र कुमार) सोबत तिची प्रेम कहाणी खुलताना पाहायला मिळणार आहे. यामुळे या वेबसिरीचा चौथा सिजन पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. हेही वाचा : नीतू कपूरचा फिटनेस मंत्रा; योगाचे महत्व दिले पटवून, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले….