कोकणात ‘कमळ’ फुलवण्यासाठी भाजपची प्रयत्नांची परिकाष्ठा; पडद्यामागून सूत्र हलवणारे अनिकेत पटवर्धन कोण?

Aniket Patwardhan : राज्यात महाविकास आघाडी (विरोधक) आणि महायुती (सत्ताधारी) आहेत. आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर असताना भाजपने मोठा डावा टाकला अन् एकनाथ शिंदेंना बंड करण्यासाठी बळ पुरवले. परिणामी आघाडीच्या सरकारला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली. त्यानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग वाढत गेले.
भाजपने राज्यातील शिवसेनेचे प्रभत्व असलेल्या कोकणात राजकीय खेळी करत कमळ फुलवायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बडे नेते भाजपवासी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ज्यावेळी मविआची सत्ता राज्यात होती, त्यावेळी भाजपने विशेष लक्ष कोकणावर केंद्रीत केले. कोकणात अनेक मोठे नेते गळ्याला लावण्यासाठी भाजपकडून रणनिती आखण्यात आली होती.
आता कोकणात कमळ फुलविण्यासाठी पडद्यामागे अनेक हालचाली होत आहेत आणि आगामी काळात होणार आहेत. त्यामुळे पडद्यामागून सूत्र हलविणाऱ्या शिलेदाराचा चेहरा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकिटवर्तीय अनिकेत पटवर्धन असे त्यांचे नाव आहे. पटवर्धन यांनी कोकणात भाजप वाढवण्यात मोठी कामगिरी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कोकणात भाजपमध्ये आणखी इनकमिंग सुरूच राहणार आहे. धैर्यशील पाटीलपासून वैभव खेडेकरांपर्यंत मोठ्या नेत्यांना भाजपात आण्यासाठी महत्वाची कामगिरी अनिकेत पटवर्धन यांनी बजावली आहे. येत्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोण आहेत अनिकेत पटवर्धन?
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विश्वासू मानले जातात.
- कोकणात महायुतीत शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये समन्वय राखण्यात महत्वाची भूमिका
- अनिकेत पटवर्धन यांनी हॉटेलमध्ये नोकरी करत शिक्षण पूर्ण केले.
- विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पटवर्धन यांनी आवाज उठवला. त्यानंतरच्या काळात त्यांच्या राजकीय करिअरला सुरूवात झाली.
- भाजपच्या संघटनात्मक पातळीवर समतोल राखण्याचे महत्वाचे काम.
- संयम, संवाद आणि परिणामकारक निर्णय या तीन गुणांवर पटवर्धन यांनी भाजपमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
- रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्याचे महायुतीचे समन्वयक म्हणून विधानसभेत त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.
हेही वाचा : Vicky Kaushal: कटरीना कैफच्या डिलिव्हरीबाबत विक्की कौशलची हिंट! म्हणाला, “मी तर घराबाहेर पडणारच नाही”





