पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपला सुप्रसिद्ध लोकगायिका मैथिली ठाकूर यांचा ‘सूर’ मिळाला आहे. मंगळवारी पाटण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जायसवाल यांच्या उपस्थितीत मैथिली यांना पक्षाची सदस्यता देण्यात आली. यानिमित्ताने तिने व्हिक्ट्री साईन दाखवत उत्साह व्यक्त केला. सूत्रांनुसार, दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून मैथिली यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. याआधी बेनीपट्टी मतदारसंघातून तिकीट मिळेल अशी चर्चा होती, पण पहिल्या उमेदवार यादीत तिचे नाव नव्हते. या प्रवेशामुळे भाजपमध्ये नवा उत्साह निर्माण झाला असून, सांस्कृतिक प्रभाव असलेल्या युवा चेहऱ्यामुळे पक्षाला फायदा होईल, असे नेते सांगत आहेत. संगीतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास मैथिली ठाकूर (२५ वर्षे), मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी येथील रहिवासी, मैथिली, हिंदी आणि भोजपुरी लोकगीतांमुळे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वडिल आणि आजोबांकडून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची ट्रेनिंग मिळालेली मैथिलीला निवडणूक आयोगाने ‘राज्य आयकॉन’ म्हणून निवडले आहे. तिने सांगितले, “मी नेहमी बिहारच्या विकासासाठी काम करू इच्छित होते. संगीतातून जोडलेले मी आता राजकारणातून सेवा देईन. पक्ष काय सांगेल, ते मी करेन निवडणूक लढणे हे माझे ध्येय नाही.” यानंतर तिने छठ गीत गाऊन माध्यमांना उद्देशून उत्सव साजरा केला. मैथिली यांच्या प्रवेशाबरोबरच भभुआ येथील राजदचे आमदार भरत बिंद यांनीही भाजपत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष दिलीप जयसवाल म्हणाले, “विपक्ष नैराश्यात आहे. जनता एनडीएवर विश्वास ठेवते. मैथिलीचा प्रवेश हे बिहारच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. एनडीए जागावाटप भाजप (BJP): १०१ जदयू (JDU) : १०१ लोक जनशक्ती पक्ष : २९ राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) : ६ हिंदुस्तानी अवाम मोर्चा : ६ दोन टप्प्यात मतदान, १४ नोव्हेंबरला निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बिहारमध्ये २४३ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होईल: पहिला टप्पा: ६ नोव्हेंबर (१२१ जागा) दुसरा टप्पा: ११ नोव्हेंबर (१२२ जागा) मतमोजणी: १४ नोव्हेंबर