BJP Leader Death : प्रशांत त्रिपाठी या भाजपच्या युवा नेत्याचे भीषण रस्ते अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक आमदार, खासदार आणि विविध पक्षांचे नेते तातडीने त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. (BJP Leader Death) मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात हरदोई जिल्ह्यातील मटिया मऊ वळणावर घडला. प्रशांत त्रिपाठी हे त्यांच्या ‘थार’ कारमधून सिधौली येथील कौटुंबिक कार्यक्रमावरून परतत होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन खोल दरीत कोसळले. (BJP Leader Death) या अपघातात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. प्रशांत त्रिपाठी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना कानपूरमधील रीजेंसी रुग्णालयात हलवण्यात येत होते. मात्र, उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. (BJP Leader Death) प्रशांत त्रिपाठी हे माजी जिल्हा पंचायत सदस्य गोपाल त्रिपाठी यांचे पुत्र होते. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच कैलाश राजपूत, अर्चना पांडे, वीर सिंह भदौरिया यांच्यासह अनेक नेत्यांनी आपले दौरे रद्द करून कुटुंबीयांची भेट घेतली. (BJP Leader Death) तसेच समाजवादी पक्षाचे माजी आमदार कल्याण सिंह दोहरे यांच्यासह इतर नेत्यांनीही श्रद्धांजली अर्पण केली. प्रशांत यांच्या पश्चात आई अरुणा त्रिपाठी, पत्नी मानसी आणि पाच वर्षांची मुलगी कनिका असा परिवार आहे. (BJP Leader Death)