BJP Leader Death : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार बलवीर पुंज यांचे शनिवारी निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने देशभरात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्याने त्यांना नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (BJP Leader Death) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. सोशल मीडियावर शोकसंदेश देताना त्यांच्या निधनाला देशासाठी मोठी हानी असल्याचे म्हटले आहे. बलबीर पुंज हे केवळ राजकारणी नव्हते, तर प्रभावी विचारवंत आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख होती. भाजपच्या बौद्धिक क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून पक्षाच्या वैचारिक दिशेला आकार देण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रीय विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते प्रसिद्ध होते. (BJP Leader Death) पत्रकारितेतून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. १९७१ मध्ये ‘द मदरलँड’ या वृत्तपत्रातून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर १९७४ मध्ये ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि जवळपास दोन दशकं तेथे कार्यरत राहिले. त्यांच्या निधनाने राजकीय आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (BJP Leader Death)