KKR Squad IPL 2026 Updates : आयपीएल २०२६ च्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने सर्वाधिक पैसे खर्च करून आपल्या संघाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. लिलावासाठी केकेआरकडे सुमारे ६४ कोटी रुपयांची सर्वात मोठी ‘पर्स’ होती, ज्यामुळे त्यांनी या लिलावात मोठ्या प्रमाणात खेळाडूंची खरेदी केली. ज्यामध्ये त्यांनी दोन विदेशी खेळाडूंवर मोठी गुंतवणूक केली. केकेआरची दोन विदेशी खेळाडूंवर मोठी गुंतवणूक – केकेआरने आपल्या लिलावाची सुरुवात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला खरेदी करून केली. त्यांनी ग्रीनसाठी २५ कोटी २० लाख रुपये खर्च केले. ग्रीननंतर, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना याच्यासाठीही मोठी रक्कम मोजली आणि त्याला १८ कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात सामील केले. केकेआरने ग्रीन आणि पथिराना या दोन खेळाडूंवर एकूण ४३ कोटी २० लाख रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली. या दोन महागड्या खेळाडूंसोबतच, केकेआरने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यालाही ९.२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले. तसेच, न्यूझीलंडचा फलंदाज टिम सीफर्ट (१.५ कोटी) आणि फिन ॲलन (२ कोटी) यांना त्यांच्या मूळ किमतीत खरेदी केले. हेही वाचा – Auqib Nabi : सलग चार चेंडूंत ४ विकेट्स घेणाऱ्या जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजावर दिल्लीने पाडला पैशांचा पाऊस भारतीय खेळाडूंवर केला लक्षणीय खर्च – भारतीय खेळाडूंच्या खरेदीतही केकेआरने मोठी गुंतवणूक केली. त्यांनी कार्तिक त्यागी, सार्थक रंजन, दक्ष कामरा, प्रशांत सोलंकी आणि तेजस्वी सिंग यांना आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. यापैकी सर्वाधिक रक्कम तेजस्वी सिंग याच्यावर खर्च केली. ३० लाख रुपये मूळ किंमत असलेल्या तेजस्वीला फ्रँचायझीने ३ कोटी रुपये देऊन संघात सामील केले. खराब कामगिरीनंतर संघाची पुनर्रचना – तीन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलेल्या केकेआर संघाची मागील हंगामातील कामगिरी अपेक्षेनुसार झाली नव्हती. ते आठव्या स्थानावर राहिले होते. त्यामुळे त्यांनी अनेक मोठ्या खेळाडूंना रिलीज करून लिलावासाठी मोठी रक्कम वाचवली होती. संघाची पुनर्रचना करण्याची केकेआरकडे चांगली संधी होती आणि त्यांनी तसाच जोरदार प्रयत्न लिलावात केला. हेही वाचा – Prashant Veer : कोण आहे प्रशांत वीर? ज्याला सीएसकेने विक्रमी बोली लावत बनवलं रातोरात करोडपती! आयपीएल २०२० साठी केकेआरचा संपूर्ण संघ (ऑक्शननंतर): अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंग, रिंकू सिंग, रोवमॅन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, कॅमेरून ग्रीन, फिन ॲलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंग, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र आणि आकाश दीप.