बंगळुरू :– कर्नाटक राज्यात मे 2023 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि देवेगौडा यांचा धर्मनिरेपक्ष जनता दल यांच्यात युती होणार असल्याची अफवा जनता दलाकडून पसरवली जाते आहे. मात्र मी हे स्पष्ट शब्दांत सांगतो की भाजपची कोणाशीही युती किंवा आघाडी होणार नसून आम्ही स्वबळावर निवडणूक लढू आणि सरकारही स्थापन करू असे त्या पक्षाचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
जनता दल आणि कॉंग्रेस पक्षावर निशाणा साधताना ते म्हणाले की, जनता दलाला मत देणे म्हणजे कॉंग्रेसला मत देण्यासारखेच आहे. कॉंग्रेससाठी सत्ता संपादन करणे म्हणजे भ्रष्टाचार करण्याचा एक प्रकार आहे. मात्र आमच्याठी सत्ता ही लोकांचे जिवनमान सुधारण्याचा मार्ग आहे.
अलिकडच्या काळात सात राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांपैकी 6 राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. या सर्व राज्यांत कॉंग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. दक्षिण भारतात कमळ फुलावे असा देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांचा संकल्प आहे.
Economy : भारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, RBIची सुधारित आकडेवारी जाहीर
दक्षिणेत भाजपला प्रवेश करायचा असेल तर कर्नाटक हेच त्यासाठी प्रवेशद्वार आहे असे मी भाजपच्या येथील कार्यकर्त्यांना सांगू इच्छीतो.