‘भाजपला केवळ सत्ता हवी, जबाबदारी नको..!’; पुर्व दिल्लीतील दुर्घटनेवरून आपचा हल्लाबोल

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाला केवळ सत्ता हवी आहे, पण त्यांना कसलीही जबाबदारी नको आहे अशी टीका आम आदमी पक्षाने केली आहे. पूर्व दिल्लीतील जलमय नाल्यात पडून एक महिला आणि तिच्या तीन वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूबद्दल मौन बाळगल्याबद्दल आपने शुक्रवारी भाजपवर ही टीका केली. पक्षाने कुटुंबाला आर्थिक मदत आणि चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना आम आदमी पार्टीचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय यांनी भाजपवर दुहेरी मापदंड अवलंबत असल्याचा आरोप केला. सुरुवातीला जेव्हा ही घटना घडली तेव्हा भाजपचे प्रवक्ते घटनास्थळी गेले आणि त्यांनी दावा केला की हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाला आहे.
पण जेव्हापासून हे नाले दिल्ली प्राधिकरणाचे असल्याचे स्पष्ट झाले तेव्हापासून त्यांनी मौन बाळगले आहे. उपराज्यपाल दिल्ली प्राधिकरणाचे चे अध्यक्ष आहेत. भाजप आता गप्प का आहे? हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, असा आरोप त्यांनी केला.
गाझीपूरमधील खोडा कॉलनीजवळ मुसळधार पावसात बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तनुजा आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा प्रियांश घसरला आणि बांधकामाधीन नाल्यात पडला. ही घटना घडली तेव्हा दोघे आठवडी बाजारातून परतत होते.
राय म्हणाले की, शून्य शक्ती असूनही दिल्ली सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, भाजपला केवळ संपूर्ण सत्ता हवी आहे, परंतु लोकांसाठी काहीही करण्याची इच्छा नाही.





