BJP : भाजप नेत्याच्या मुलाचा प्रताप; पोलिसांवरच घातली कार
Updated On:

BJP | Police – शहरातील तुकोगंज परिसरात भाजप नेते कमाल खान यांचा मुलगा मेजर खान याने गुन्हे शाखेच्या पथकावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्यांच्या कारखाली एक दुचाकी आली आणि एक हेड कॉन्स्टेबल जखमी झाला. पोलिसांना मेजर खानच्या कारमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने धेणू मार्केट परिसरात छापा टाकला.
कारमध्ये मेजर खानसोबत एक तरुणीही होती. तपासणीदरम्यान मेजर खानने पोलिसांशी वाद घातला आणि गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्या कृत्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली आणि तुकोगंज पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. सध्या मेजर खानला ताब्यात घेण्यात आले आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे.





