Indian Men Hockey : कॅप्टन हरमनप्रीतची हॅटट्रिक! भारतीय हॉकी संघाने मलेशियाचा ४-२ ने पाडला फडशा, सेमीफायनलमध्ये मारली धडक
Indian Men Hockey : भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मलेशियाला ४-२ ने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Indian Men Hockey Team Beat Malaysia 4-2 In Asian Champions Trophy Semi Final Berth : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपला दबदबा कायम राखत रविवारी जालंधर येथे झालेल्या सामन्यात मलेशियाचा ४-२ असा धुव्वा उडवला. पूल टप्प्यातील या महत्त्वपूर्ण विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत (Semi-Final) दिमाखात प्रवेश केला आहे. संपूर्ण सामन्यावर भारतीय खेळाडूंनी पकड मजबूत ठेवली होती; घरच्या मैदानावर प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास अधिक उंचावलेला दिसला.
कॅप्टन हरमनप्रीत सिंगचे वादळ; पेनल्टीवर डागली शानदार हॅटट्रिक
भारताच्या या दिमाखदार विजयात कर्णधार हरमनप्रीत सिंग हा सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने मैदानात गोलचा धडाका लावत अप्रतिम हॅटट्रिक नोंदवली. हरमनप्रीतने सामन्याच्या दोन्ही हाफच्या सुरुवातीला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर अचूक गोलमध्ये केले. त्यानंतर सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर कोणतीही चूक न करता चेंडू जाळ्यात धाडून आपली हॅटट्रिक पूर्ण केली आणि मलेशियाच्या पुनरागमनाच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या.
सुखजीत सिंगचा शानदार गोल; मलेशियाचा प्रतिकार निष्फळ
FOUR WINS OUT OF FOUR! INDIA KEEP ROLLING! 🇮🇳🔥
The defending champions make it four victories on the trot with a 4-2 win over Malaysia in a thrilling top-of-the-table clash, as Captain Harmanpreet Singh leads from the front with a sensational hat-trick to power India to another memorable win at the Hero Asian Champions Trophy Punjab 2026! 🇮🇳🔥🏑
Next Up: South Korea on Monday, November 2.
#HockeyIsBack #HACT2026 #SatSriAkalAsia #IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) November 1, 2026
सामन्यात भारतीय आक्रमणाने मलेशियाच्या बचावफळीवर सातत्याने दबाव कायम ठेवला. हरमनप्रीतच्या दोन गोलनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या सुखजीत सिंगने ४३ व्या मिनिटाला एक अप्रतिम मैदानी गोल डागून भारताची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. मलेशियाकडून २५ व्या मिनिटाला अनवार अखिमउल्लाहने गोल करून बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला होता; तर सामन्याच्या शेवटच्या काही सेकंदांत सिल्वेरियसने दुसरा गोल केला, मात्र तो केवळ पराभवातील अंतर कमी करू शकला.
सलग चार विजयांसह गुणतालिकेत अव्वल; दक्षिण कोरियाशी पुढची लढत
FOUR IN A ROW, AND THE CHARGE CONTINUES! 🇮🇳🔥
Relive the best moments from India’s thrilling 4-2 victory over Malaysia, as Captain Harmanpreet Singh’s sensational hat-trick powered the defending champions to their fourth consecutive win at the Hero Asian Champions Trophy Punjab 2026! 🏑💪
India stay unbeaten and remain at the top of the table! 🙌
#HockeyIsBack #HACT2026 #SatSriAkalAsia #IndiaKaGame
— Hockey India (@TheHockeyIndia) November 1, 2026
या दणदणीत विजयासह भारतीय संघाने ४ सामन्यांतून १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेत अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित झाले असले, तरी भारतीय संघ आपल्या राउंड रॉबिन फेरीतील अखेरचा सामना सोमवारी दक्षिण कोरियाविरुद्ध खेळणार आहे. चालू स्पर्धेतील भारताचा फॉर्म पाहता जेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून टीम इंडियाने आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे.





