Bigg Boss Marathi 6 : गौतमीचा ‘बिग बॉस’ मराठीला नकार, आता ‘या’ लावणी डान्सरची होणार एन्ट्री? Video आला समोर !

Gautami Patil | Bigg Boss Marathi 6 | Sayali Patil : ‘बिग बॉस हिंदी’चा धमाका संपल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले आहेत ते ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे. या नव्या सीझनचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे, मागील सीझनप्रमाणेच यंदाही सुपरस्टार रितेश देशमुख आपल्या हटके स्टाईलने सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. मात्र, यंदा घरामध्ये कोणते स्पर्धक जाणार, याची चर्चा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.
गौतमी पाटीलने नाकारली ऑफर!
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलच्या नावाची मोठी चर्चा होती. गौतमीला बिग बॉसकडून विचारणाही करण्यात आली होती, मात्र तिने स्वतः स्पष्टीकरण देत या शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे गौतमीच्या चाहत्यांचा हिरमोड झाला असला, तरी आता एका दुसऱ्या प्रसिद्ध लावणी डान्सरच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
सायली पाटीलला ‘बिग बॉस’चा बुलावा?
गौतमी पाटीलच्या एक्झिटनंतर आता लावणी डान्सर सायली पाटील हिची ‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. सायलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने तिला बिग बॉस्कडून मेल आल्याचा दावा केला आहे.
व्हिडिओमध्ये सायली म्हणाली: “मला बिग बॉस मराठीकडून दोन दिवसांपूर्वीच मेल आला आहे. त्यांनी मला विचारलंय की मी शोमध्ये येण्यासाठी इंटरेस्टेड आहे का? आता तुम्हीच सांगा, मी बिग बॉसमध्ये जायला हवं का नको? कमेंटमध्ये नक्की कळवा.”
हा व्हिडिओ सायलीच्या एका फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. सायलीच्या मुख्य अकाउंटवर हा व्हिडिओ दिसत नसल्याने, ही केवळ चर्चा आहे की खरंच तिला ऑफर मिळाली आहे, याबाबत संभ्रम कायम आहे.
कोण आहे सायली पाटील?
सायली पाटील ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लावणी डान्सर आहे. गौतमी पाटीलप्रमाणेच सायलीचे लावणीचे कार्यक्रम राज्यभर गाजतात. सोशल मीडियावरही तिची मोठी फॅन फॉलोइंग असून इन्स्टाग्रामवर तिचे ८४ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे डान्स रील्स नेहमीच व्हायरल होत असतात, त्यामुळे जर ती बिग बॉसच्या घरात आली, तर शोमध्ये मोठी रंगत येईल.





