Hit and run case | गेल्या वर्षी पुण्यातील कल्याणीनगर भागात हिट अॅन्ड रनची घटना घडली होती. या घटनेची राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चा झाली. या अपघातामध्ये दोन निष्पापांना आपला जीव गमावावा लागला. पोर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण आणि तरुणीला जोराची धडक दिली होती. ही धडक इतकी जोराची होती की दोघेही हवेत काही फुट उंच उडून रस्त्यावर पडले होते. या अपघाताच्या घटनेत या दोघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. अपताच्या घटनेचा थरकाप व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अग्रवाल यांच्या नातवाचे नाव समोर आले होते. आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला न्यायालयाने ३०० पानाांचा निबंध लिहिण्याची आणि वाहतूक नियंत्रण देण्याचे आदेश याची शिक्षा सुनावली होती. यानंतर राज्यभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सुरुवातीला या प्रकरणात दिरंगाई झाली होती. पण आता पोलिसांच्या कारवाईला वेग आला धनाढ्य बापाच्या मुलाला शिक्षा मिळाली होती. अशातच आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या निलंबित केलेल्या तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांना पोलिस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलिस महासंचालकाकडे पाठवला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक निरीक्षक विश्वास तोडकरी असे प्रस्ताव पाठविलेल्या दोन अधिकाऱ्यांचे नाव आहे. संबंधितांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी २४ मे २०२४ या दिवशी सेवेतून निलंबित केले होते. कल्याणीनगर भागात १८ मे र०२४ रोजी पबमधून पार्टी करून भरधाव वेगाने पोर्श कार चालवून दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. यानंतर अनेक नाट्यमय घटामोडी या प्रकरणात घडल्या होत्या. या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले होते. ते चौकशीत दोषी आढळून आल्याने त्यांना पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचा प्रस्तावर पाठवण्यात आला आहे.