पुणे जिल्हा | पुणे येथील संवाद मेळाव्यात आमदार थोपटे यांना मोठा प्रतिसाद

भोर,(प्रतिनिधी) – भोर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बु.पुणे येथे पुणे रहिवासी नागरिकांचा संवाद मेळावा, दि.१९ रोजी संपन्न झाला.
या मेळाव्यास नागरिक बंधू भगिनिंनी मोठा प्रतिसाद देवून विधानसभेच्या निवडणुकीसाठी संग्राम थोपटे यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी उपस्थित नागरिकांसमवेत सवांद साधला असताना राजगड (वेल्हा) तालुक्यातील सुमारे १५० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर अनेक तरुण कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्ती करून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या वेळी वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष संतोष रेणुसे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानासो राऊत, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, मा.सभापती दिनकरराव सरपाले, सीमा राऊत,
राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ.संभाजी मांगडे, संदीप नगीने, महिला अध्यक्षा आशा रेणुसे, भोर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे,
वेल्हा तालुका युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, राजगड(वेल्हा) तालुक्यातील पुणेस्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





