पुणे जिल्हा | मुळशी तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त नागरिकांशी सवांद साधला

भोर, (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली. यामध्ये प्रमुख्याने पाणी पुरवठा योजना, प्रमुख रस्ते, गावांना जोडणारे रस्ते, लहान मोठे पूल, ग्रामपंचायत कार्यालय, सभामंडप, रस्ते कॉंक्रिटीकरण, शाळा इमारत, क्रीडा संकुलन, प्रशासकीय इमारत आदी कामे मार्गी लावता आली,
उर्वरित कामे प्रगतीत आहेत आज या भागातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन व आशिर्वाद घेऊन गावभेट दौरा सुरू केला, असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, फार कमी वेळात हा दौरा आयोजित केला आहे, लोकसभेच्या निवडणुकीत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताधिक्याने आपण निवडून दिल.
शरद पवार यांच्या स्वाभिमानावर घाला घालून आणि उध्दव ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांना देखील राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा दोन दिवसात होणे अपेक्षित.
उमेदवारीची घोषणा झाल्यावर, फॉर्म भरणे आणि प्रचार करणे यासाठी कमी कालावधी आहे. काल राजगड (वेल्हे) तालुक्यातील मेंगाई देवीचा आशीर्वाद घेऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात केली.
उद्याच्या येणाऱ्या २० तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे. साधारण २७ दिवसच शिल्लक आहेत. विकास कामे ही न संपणारी प्रक्रिया आहे. कामे कायमच चालू राहणार.
याभागात एस.टी.चा सेवा हा महत्त्वाचा विषय आहे. येथील एस. टी. सुरळीत कशी सुरू राहील यासाठी विशेष लक्ष दिले आहे. सुप्रिया सुळे यांनीसुध्दा वेळोवेळी सहकार्य केलं.
महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून घोषणा केल्याच्या नंतर मेळाव्याच्या रूपात आपल्यासमोर येऊ. २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आंनदा आखाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती कोमल वशिवले,
पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजीराव जांभुळकर, कार्याध्यक्ष सुरेश आण्णा पारखी, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते,
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला अध्यक्षा दिपाली कोकरे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निकिता सणस, कार्याध्यक्षा सविता गव्हारे, ज्योती जोरी, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल जाधव, मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप साठे, सोशल मिडीया अध्यक्ष गोपाळ कदम यांच्यासह दिग्विजय हुलावळे,
लक्ष्मण आप्पा ठोंबरे, अमोल गांधी तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ महिला व तरुण वर्ग उपस्थित होते.





