पुणे जिल्हा | काॅंग्रेसचे संग्राम थोपटे आज उमेदवारी अर्ज भरणार

भोर, (प्रतिनिधी) – भोर विधानसभा मतदार संघातील महाआघाडीची उमेदवारी लवकरच जाहीर होणार असून या मतदार संघात काँग्रेसला उमेदवारी मिळणार असल्याचे या पूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केले.
गुरुवारी, दि.२४ रोजी मी माझा उमेदवारी अर्ज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणार असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी पुणे व मुळशी तालुक्यातील संवाद मेळाव्यात जाहीर केले.
या वेळी बोलताना आमदार संग्राम थोपटे यांनी गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये भोर वेल्हा मुळशी तालुक्यात केलेल्या विकास कामांचा आढावा घेवून या वेळीही विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सेवेची संधी द्यावी,
असे आवाहन करून या मतदार संघातील मतदार विरोधकांच्या कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी आमदार संग्राम थोपटे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
सत्ताधारी सरकार द्वेशाचे राजकारण करत असल्याचा आरोप करताना राजगड सह. साखर कारखान्याचे मंजूर कर्ज स्थगित करणे, औद्योगिक वसाहतीच्या प्रश्नात यांनीच खोडा घालायचा आणि दोष आम्हाला द्यायचा,
असले उद्योग करून तरुणांना भडकावण्याचे काम केले जात असल्याचे सांगून हे सरकार जनहितापेक्षा द्वेषाचेच राजकारण करत आहे. उद्याच्या २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, पुणे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य आंनदा आखाडे, पंचायत समितीच्या माजी सभापती कोमल वशिवले,
पुणे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजीराव जांभुळकर, कार्याध्यक्ष सुरेश आण्णा पारखी, मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुहास भोते, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला अध्यक्षा दिपाली कोकरे,
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निकिता सणस, कार्याध्यक्षा सविता गव्हारे, ज्योती जोरी, भोर विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल जाधव, मुळशी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप साठे,
सोशल मिडीया अध्यक्ष गोपाळ कदम यांच्यासह दिग्विजय हुलावळे, लक्ष्मण आप्पा ठोंबरे, अमोल गांधी तसेच विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ महिला व तरुण उपस्थित होते.





