भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा; इन्कम टॅक्समध्ये मिळणार जबरदस्त सूट

Union Budget 2025 : मोदी सरकारने भाडेकरू आणि घर मालकांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज जाहीर केलेल्या नव्या अर्थसंकल्पानुसार, आता सहा लाख रुपयांपर्यंत भाड्याने राहणाऱ्या नागरिकांचा टीडीएस कापला जाणार नाही. आतापर्यंत याची वार्षिक मर्यादा २.४ लाख रुपये इतकी होती. सरकारच्या या घोषणेमुळे भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूंना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
TDS मधून सूट मिळवण्यासाठीची वार्षिक मर्यादा २.४ लाख रुपये इतकी होती. गेल्या काही वर्षांमध्ये घरभाड्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तेव्हा TDS मधून सूट वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. एखादी व्यक्ती ज्याचे वार्षिक घर भाडे २.४ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या व्यक्तीला TDS कापून घरमालकाला भाडे द्यावे लागत होते. आता वार्षिक भाड्यावर सूट मिळाल्याने ६ लाख रुपयांपर्यंत वार्षिक भाडे भरणाऱ्या भाडेकरूला TDS कापण्याची गरज नाही. यामुळे भाडेकरूना मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यावरही भर : निर्मला सीतारामन
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले कि, मध्यमवर्गीयांचा फायदा व्हावा या हिशोबाने सरकारने इनकम टॅक्सशी निगडीत नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. सरकार पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक संसदेत मांडणार आहे. त्यामध्ये मध्यमवर्गीयांना करात सवलत देण्यावरही भर देण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.





