Maharashtra IAS Transfer : मोठी बातमी..! महाराष्ट्रातील तीन बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाला कुठे मिळाली जबाबदारी?
Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र राज्य शासनाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी राज्यातील तीन उच्चपदस्थ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत.

Maharashtra IAS Transfer : महाराष्ट्र सरकारने ५ ऑक्टोबर रोजी तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी संजय खंदारे, तसेच संजय यादव आणि वैष्णवी बी. यांचा समावेश आहे. या बदल्यांनंतर संबंधित अधिकाऱ्यांना नव्या पदांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. (Maharashtra IAS Transfer)
संजय खंदारे यांची वन विभागात नियुक्ती
१९९६ च्या बॅचचे IAS अधिकारी संजय खंदारे हे आतापर्यंत पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांची आता वन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IAS Transfer)
संजय यादव यांच्याकडे पर्यटन विभागाची जबाबदारी
२००९ च्या बॅचचे IAS अधिकारी संजय यादव हे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांची आता पर्यटन विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IAS Transfer)
वैष्णवी बी. यांची नागपूरमध्ये बदली
२०१९ च्या बॅचच्या IAS अधिकारी वैष्णवी बी. यांची नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Maharashtra IAS Transfer)
राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी नव्या पदाची जबाबदारी स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. (Maharashtra IAS Transfer)





