NCP news : मोठी बातमी..! राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ
NCP news : वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सय्यद इमरान अली यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्त केला आहे.

NCP news : गोवंश डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावामुळे वसमत नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इमरान अली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर वसमतच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून, रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (NCP news)
काही दिवसांपूर्वी वसमत ग्रामीण पोलिसांनी जवळा खंदारबन शिवारात छापा टाकून १९ गोवंश जप्त केले होते. या प्रकरणी उपनगराध्यक्ष इमरान अली यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, गोवंश उपाशी ठेवून त्यांची कत्तल करण्याचा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (NCP news)
पोलिस चौकशीत संबंधित शेत आपण शेख जाकेर याला खंडाने दिल्याचे इमरान अली यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शेख जाकेर याच्याविरोधातही गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर वसमत शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. अली यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी करत शहर बंद ठेवण्यात आले, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. (NCP news)
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इमरान अली यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच या वादग्रस्त प्रकरणामुळे त्यांच्यावर सर्व बाजूंनी दबाव वाढला. अखेर त्यांनी नगराध्यक्षा सुनीता बाहेती यांच्याकडे राजीनामा सादर केला. हा राजीनामा स्वीकारण्यात आला असून पुढील मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (NCP news)
इमरान अली हे आमदार राजू नवघरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून कोणाला संधी दिली जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (NCP news)
NCP Sharad Pawar : रोहित पवारांचा संकेत खरा ठरला! शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठे फेरबदल






