महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का! काँग्रेसचे तब्बल ‘इतके’ नगरसेवक भाजपात, आकडा एकदा पाहाच
Updated On:

Congress | BJP – राज्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या 9 विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या एकूण 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कुही नगरपंचायतीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान नगरसेवकांचा यात समावेश आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा पार पडला. त्यानंतर भाजपत हा मोठा प्रवेश झाल्याचे समोर आले आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांच्या नेतृत्वात नागपूर ग्रामीण कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील या पक्षप्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित होते.





