भाजपच्या जाहीरमान्यात ७० वर्षांवरील व्यक्तींसाठी मोठी घोषणा; जाणून घ्या काय होणार फायदा?

BJP Manifesto 2024 | लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज 14 एप्रिल रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या मुख्यालयात पंतप्रधान मोदींनी संकल्प पत्राचे अनावरण केले. यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर गृहमंत्री अमित शाह, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते.
भाजपच्या या जाहीरनाम्यात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधण्याची योजना असणार आहेत. याशिवाय ७० वर्षांवरील लोकांसाठी भाजपने मोठी घोषणा करण्यात आली आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेता येणार आहे. ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार आहे. याशिवाय मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी? BJP Manifesto 2024 |
“भाजपाने दिलेले सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. देशातील जनतेला भाजपावर विश्वास आहे. हा जाहीरनामा युवा, शेतकरी, नारी शक्ती, गरीबांवर आधारीत आहे. गरीबांसाठी ३ कोटी घरे बांधण्याचा संकल्प आमचा आहे. आता घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे”, अशा मोठ्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.
घरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार BJP Manifesto 2024 |
भाजपच्या जाहीरनाम्यात गरीबांसाठी तीन कोटी घरे बांधली जाणार आहेत. तसेच घरांपर्यंत पाईपलाईनने गॅस पोहोचविणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. गरिबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक समाधानकारक आणि परवडणारे असेल, याची दक्षता घेऊ, असेही मोदी म्हणालेत.
मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार
७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार आहेत. गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार असून पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाणार आहे.
तृतीयपंथीसाठी मोठी घोषणा
मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार आहे. देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार. पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहेत. याशिवाय तृतीयपंथी समुदायाला देखील आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा:
कंगनाच्या विरोधात काँग्रेसकडून लढणार ‘हा’ तगडा उमेदवार; मंडीत होणार रंजक लढत





