PM Modi on Nana Patekar: “नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वात मोठी पोकळी” ; पंतप्रधान मोदींनी आठवणींना दिला भावपूर्ण उजाळा
PM Modi on Nana Patekar:

PM Modi on Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
पंतप्रधान मोदी यांनी, नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणली. त्यामुळे त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका अनेक पिढ्यांच्या स्मरणात कायम राहतील, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
श्री नाना पाटेकर यांच्यासारखी झोकून देण्याची वृत्ती, स्वतःचे वेगळेपण आणि एक आगळा प्रभाव फारच मोजक्या अभिनेत्यांमध्ये पाहायला मिळतो. त्यांनी प्रत्येक भूमिकेत विलक्षण विविधता आणि सर्जनशीलता आणत, अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहतील अशा भूमिका आपल्यासाठी साकारल्या. आपल्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही त्यांचा मोठा आदर केला जायचा, स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना ते कधीही डगमगले नाहीत.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत श्री नाना पाटेकर यांचे योगदान अफाट होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंब, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2026
नाना पाटेकर त्यांच्या स्पष्ट आणि परखड विचारांसाठीही ओळखले जात होते. स्वतःच्या विश्वासावर ठाम राहून मत मांडताना त्यांनी कधीही डगमगण्याची भूमिका घेतली नाही, असेही पंतप्रधानांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले. PM Modi on Nana Patekar:
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर यांचे योगदान अफाट असल्याचे सांगत मोदी यांनी त्यांच्या निधनामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे नमूद केले. तसेच नाना पाटेकर यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.





