Bhaskar Jadhav : “एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि… “; भास्कर जाधवांच्या विधानाने चर्चांना उधाण
Bhaskar Jadhav : २२ जानेवारीला मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई महापालिकेचे महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले असून, भाजपचा महापौर बसवण्यासाठी मोठ्या हालचाली होत आहेत.

Bhaskar Jadhav : २२ जानेवारीला मुंबईत झालेल्या आरक्षण सोडतीत मुंबई महापालिकेचे महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव करण्यात आले असून, भाजपचा महापौर बसवण्यासाठी मोठ्या हालचाली होत आहेत.
अनेक नावांची चर्चा सुरू आहे. तर उपमहापौर पद शिंदेसेनेला मिळू शकते अशी शक्यता आहे. या सगळ्यात आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एक मोठं विधान केले आहे.
“एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि मुंबईत शिवसेनेचा महापौर करावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्यावर्षी त्यांना हीच खरी श्रद्धांजली असेल”. असे मोठं विधान भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav) यांनी केले आहे. यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी उलधापालध होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
या विधानातून भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंना मदत करण्याचे आवाहन केले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षीच्या निमित्ताने भास्कर जाधव यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात यावर भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?
“माझ्या मनात प्रचंड दुःख आहे की, हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि यावर्षी मुंबई महापालिकेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर बसणार नाही. यासारखे दुसरे दुःख नाही. जे कोणी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जातो असं सांगतात, वारसदार आहे म्हणून सांगतात त्यांना मी विनंती करतो, हे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. इथेच तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्धा आहे का? बाळासाहेबांसमोर तुम्ही नतमस्तक होऊ इच्छिता का? तुम्ही बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता का? जर श्रद्धांजली अर्पण करू इच्छिता तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे.” अस स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार: उद्धव ठाकरे
मुंबई महापालिकेवर महापौर बसवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शिवसेनेकडून देखील महापौर पद मिळण्यासाठी दावा केला करण्यात आला होता. त्यामुळेच शिंदेसेनेच्या २९ नगरसेवकांना ताज हॅाटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या सगळ्यात उद्धव ठाकरे यांनी देखील एक सूचक विधान केले होते. “देवाची इच्छा असेल तर मुंबई महापालिकेत शिवसेनेचा महापौर बसेल.”
यानंतर उद्धव ठाकरेंचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav ) यांनी आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून बाळासाहेब ठाकरे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे जे उमेदवार देतील त्याला आम्ही मदत करू. एकनाथ शिंदे यांनी हे सांगण्याचे धाडस दाखवलं पाहिजे, असे आवाहन एकनाथ शिंदेंना केले आहे.
हेही वाचा : आव्हाडांवर खालच्या शब्दांत टीका; ‘त्या’ नगरसेविकेचा रोहित पवारांकडून समाचार, थेट इशारा देत म्हणाले…






