वाघोली : केसनंद (ता.हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारत हरगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. हरगुडे यांच्यावर पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हवेली तालुक्यातील प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून केसनंद ग्रामपंचायत ओळखली जाते. पुणे महानगरपालिका हद्दीलगत केसनंद गाव असल्याने गावाचा विकास केसनंद मधील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच धनाजी हरगुडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ यांच्याकडून भारत हरगुडे यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव, वाघोली ग्रामपंचायतचे आदर्श माजी उपसरपंच महेंद्र भाडळे, ग्रामपंचायत सदस्य सुधीर भाडळे, उद्योजक सागर जाधव, यांच्या हस्ते भारत हरगुडे यांच्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देत विकासाभिमुख निर्णय घेऊन गावाचा विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच भारत हरगुडे यांनी यावेळी सांगितले. भारत हरगुडे यांच्या निवडीबद्दल आमदार माउली कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, माजी सरपंच मिलिंद हरगुडे, उद्योजक रमेश हरगुडे पाटील, माजी सरपंच तानाजी हरगुडे, प्रमोद हरगुडे, राजेंद्र सावंत, नितीन गावडे आदींनी अभिनंदन केले.