Gram Panchayat Election: पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे बिगुल; भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये 28 एप्रिलला मतदान
Gram Panchayat Election: निवडणूक जाहीर होताच भोर तालुक्यात राजकीय सरगर्मी वाढली आहे. विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून रिक्त जागांसाठी सर्वसमावेशक आणि प्रबळ उमेदवार देण्याकरिता गावपातळीवर रणनीती आखली जात आहे.

Gram Panchayat Election: पुणे जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांनंतर आता पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
९ सरपंच आणि ३४ सदस्यपदांसाठी निवडणूक-
भोर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ९ थेट सरपंच पदे आणि ३४ सदस्य पदे रिक्त आहेत. निधन, राजीनामा तसेच इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. या सर्व जागांसाठी एकत्रितपणे पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक कार्यक्रम एका दृष्टिक्षेपात –
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया पुढीलप्रमाणे राहील —
३० मार्च : तहसीलदारांकडून अधिकृत नोटीस प्रसिद्ध
७ ते १३ एप्रिल : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी
१५ एप्रिल : उमेदवारी अर्जांची छाननी
१७ एप्रिल : अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत
२८ एप्रिल : प्रत्यक्ष मतदान
२९ एप्रिल : मतमोजणी व निकाल जाहीर
हेही वाचा – चाकणची वाहतूक कोंडी फुटणार; तळेगाव-चाकण 4 पदरी उन्नत महामार्गास मान्यता
गावागावांत रणनीतीची आखणी –
निवडणूक जाहीर होताच भोर तालुक्यात राजकीय सरगर्मी वाढली आहे. विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून रिक्त जागांसाठी सर्वसमावेशक आणि प्रबळ उमेदवार देण्याकरिता गावपातळीवर रणनीती आखली जात आहे. ९ सरपंचपदे कोणत्या पक्षाच्या पदरात पडतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.





