Accident News : भंडाऱ्यात भीषण अपघात; ट्रक-एसयूव्हीच्या धडकेत तीन मुलांसह 8 जणांचा जागीच मृत्यू
Accident News : भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली तालुक्यादरम्यान पिंपळगावजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे एक अत्यंत दुर्दैवी अन् काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला.

Accident News : भंडारा जिल्ह्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. दोन वाहनांच्या अपघातात तीन मुलांसह 8 मजुरांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की आठही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. (Accident News)
भंडारा जिल्ह्यातील लाखनी साकोली तालुक्याच्या पिंपळगावजवळ शुक्रवारी पहाटे हा अपघात घडला. ट्रक आणि एसयूव्ही यांच्यात हा अपघात झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले छत्तीसगड राज्यातील मजूर होते, अशी माहिती मिळत आहे. (Accident News)
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही मजूर एसयूव्ही चारचाकीने नागपूरच्या दिशेने प्रवास करत होते. हे मजूर छत्तीसगडमधील होते. भंडारा जिल्ह्यातील पिंपळगावमधील एका पेट्रोल पंपावरून एक ट्रक रस्त्यावर जाण्यासाठी बाहेर निघत असताना मागून येणाऱ्या भरधाव एसयूव्ही चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडकला. (Accident News)
ही धडक एवढी जबरदस्त होती की चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला आणि त्यातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या वाहनामध्ये अनेक मजूर होते. भाऊच्या ढाब्याजवळ ही दुर्घटना घडली. त्यातील काही मजूर जखमी झाले आहेत. त्या सर्वांना नॅशनल हायवे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे भंडारामधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. (Accident News)
दरम्यान, गुरुवारी (10 सप्टेंबर) रात्री नांदेड – भोकर मार्गावर झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणजेच 12 तासांत दोन भीषण अपघात होऊन त्यात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबाबद्दल त्यांनी सहानभूती व्यक्त केली आहे. (Accident News)
Accident News : पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, चार जण जखमी
Accident News : केरळमध्ये भीषण अपघात! तमिळनाडूतील 8 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू





