Abhijeet Dipke : हा नवा भारत, झुकणार नाही; मुंबईतील तरुणाईसोबत अभिजित दिपकेंनी साधला संवाद
शिवाजी पार्क परिसरात आज नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन (Abhijeet Dipke) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तरुणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केलं.

Abhijeet Dipke : शिवाजी पार्क परिसरात आज नीट पेपरफुटीच्या मुद्यावरुन (Abhijeet Dipke) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर जमली होती. तरुणांकडून तिरंगा हाती घेत राष्ट्रगीत गायन केलं.
या प्रसंगी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शर्मिला ठाकरे, तुषार गांधी, अभिनेता अतुल कुलकर्णी सहभागी झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या फोनवरुन अभिजित दिपके (Abhijeet Dipke) यांनी मुंबईतील तरुणाईसोबत संवाद साधला.
आदित्य ठाकरेंनी अभिजित दिपके यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला. कॉकरोच जनता पार्टी, सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून समर्थन दिल्याबद्दल अभिजित दिपके यानं उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. आदित्य ठाकरे यांनी अभिजित दिपके यांच्यासोबत संवाद साधताना राजीनामा घेऊनच व्यवस्था बदलायची आहे. हा नवा भारत आहे, झुकणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांचे उपोषण संपले आहे, आपण सर्वजण त्यांचे आभार मानूया. उपोषण संपले आहे मात्र आंदोलन संपलेले नाही. अभिजित दिपके (Abhijeet Dipke) आणि इतर युवक दिल्लीत आंदोलन करत आहेत. आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे तोपर्यंत शांत बसायचे नाही, असेही आवाहन आदित्य ठाकरेंनी केले. लाठीमार सहन केल्यानंतर तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता काय? असा सवाल आदित्य ठाकरेंनी युवकांना केला.






